रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांनी आता धोक्याची पातळी ओलांडली

पावसामुळे जनजीवन पूर्ण पणें विस्कळीत ,  पनवेल, रसायनी, कर्जत, खालापूर, पेण येथे मुसळधार पाऊस


प्रेस मीडिया लाईव्ह : 

सुनील पाटील : 

 रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांनी आता धोक्याची पातळी ओलांडली असून  नदीकिनारी सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.  पावसा मुळे जनजीवन पूर्ण पणें विस्कळीत झाले आहे. पनवेल, रसायनी, कर्जत, खालापूर, पेण येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. सलग 3 दिवस जोरदा पाऊस पडत असल्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाताळगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. 


राज्य महामार्गावरील पाली आंबा नदी पुलावरील जुन्या पुलावरून वेगवान प्रवाहात पाणी जात आहे. नवीन पुलाला पाण्याने पूर्ण पणे वेढले आहे. भैरव सुधागड पुलावरून पाणी वाहू लागले आहे. नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला अडकले आहेत. दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


रसायनी येथे पोलीस ठाण्यात पाणी साचले आहे. गुडघाभर पाण्यामुळे रसायनी पोलीस ठाण्यात काम करणे कठीण झाले आहे.सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने घाटमाथ्यावर वाहनचालकांनी सतर्कतेने प्रवास करावा. शक्य असल्यास घाटातील प्रवास टाळावा; असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post