प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील:
गुळसुंदे येथे गेल्या दहा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जलजीवन योजनेअंतर्गत या गावांमध्ये पाणी योजना राबवण्यात आली. चावणे येथील जॅकवेल मधून पाईपलाईन टाकण्यात आली.पाईपलाईन पाताळंगगा नदीवरील चावणे धरणा वरून घेण्यात आली. काम झाल्यापासून दोनच महिन्यात पहिल्या पावसात ही पाईपलाईन वाहून गेली. त्यामुळे गेल्या बारा दिवसापासून गुळसुंदा व आजूबाजूच्या आदिवासी वाड्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.
ही बाब महाराष्ट्र निर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी यांच्या निदर्शनास मनसे शाखाध्यक्ष निखिल पाटील यांनी आणून दिली. दीपक कांबळी यांनी त्वरित गुळसुंदा ग्रामपंचायत येथे प्रशासक श्री. राजेश घरत साहेब आणि ग्रामसेवक श्री. रामदास दासगावकर यांच्याबरोबर चर्चा केली. सदर कामाचे ठेकेदार यांच्याबरोबर दीपक कांबळी यांनी फोनवर चर्चा करून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत गुळसुंदे गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली ठेकेदार श्री. मांडे यांनी मागणी मान्य केली. आज पासून गुळसुंदे गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. पर्यायी व्यवस्था होई पर्यंत मनसे तर्फे पाठपुरवठा करण्यात येईल.
सदर प्रसंगी दीपक कांबळी यांच्या समवेत निखिल पाटील,भास्कर डुकरे, अक्षय मोरे, किरण मोरे, धनंजय मोरे इत्यादी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.