प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या स्वच्छ राजकारणावर प्रभावित होत वावोशी ग्राम पंचायतीचे माजी सरपंच तथा शिवसेनेचे जेष्ठ नेते वालचंदशेठ ओसवाल यांनी आज आपल्या सवंगड्यांसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने वावोशी छत्तीशी विभागासह संपूर्ण खालापूर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
वालचंदशेठ ओसवाल हे वावोशी ग्राम पंचायतीमधील मातब्बर राजकारणी म्हणून ओळखले जातात. एकहाती सत्ता काबीज करणे हा त्यांचा हातखंड आहे.ते वावोशी ग्राम पंचायतीचे अनेक वर्ष बिनविरोध सरपंच होते.ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता वावोशी ग्राम पंचायतीवर येते अशी अख्यायिका आहे.त्यांनी आपल्या सवंगड्यांसह नुकताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यांंचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रायगडचे सर्वेसर्वा सुनिल तटकरे, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती ताई तटकरे तसेच खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुतांश कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
____कोट -
खासदार सुनिल तटकरे यांची काम करण्याची पध्दत राजकारणात कोणालाही जमणार नाही.कार्यकर्ता कसा सांभाळायचा यांची हातोटी त्यांना चांगली अवगत आहे.त्यामुळे आम्ही बहुतांश कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम आम्ही मोठ्या जोमाने करणार आहोत.
--- वालचंदशेठ ओसवाल
माजी सरपंच तथा जेष्ठ नेते वावोशी