प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांना खंडणी प्रकरणी पेण पोलिसांनी अटक केली आहे. पेण तहसील कार्यालयातील सेतू कार्यालय सुरू ठेवण्यासाठी ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दीड लाख रुपये खंडणी घेताना पकडण्यात आलं आहे.
पेणचे डी वाय एस पी शिवाजी फडतरे आणि पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी संदीप ठाकूर याने फेसबुक लाईव्ह करून पेण सेतू कार्यालयातील गैर कारभारावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर सेतू केंद्र चालकाकडे सेतू कार्यालय सुरू ठेवण्यासाठी १० लाख रुपये इतक्या खंडणीची मागणी केली होती. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली. पेण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. संदीप ठाकूर याला आज दुपारी न्यायालय समोर हजर केलं जाणार