.तर दरडीखाली 50 ते 60 घरे आणि तब्बल 100 ते 200 लोक दबल्याची भीती
प्रेस मीडिया लाईव्ह :
सुनील पाटील :
खालापूर जवळील इर्शाळवाडीवर (इर्शाळगड ) इथं बुधवारी रात्री पावसामुळं दरड कोसळल्याची घटना घडली आहे , या मध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे तर आता पर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. या दुर्घटने मध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे
या गावा मध्ये साधारण 50 ते 60 घरांची वस्ती असून जवळपास 200 ते 300 मतदार असल्याची माहिती मिळाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे 30 ते 40 घरातील लोक अडकल्याची माहिती मिळाली आहे. रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही लँड्स लाईडची घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यामधील इर्शाळवाडी इथं ही घटना घडली आहे. NDRF चे बचावकार्य सुरु आहे. डोंगरावर सतत सुरू असलेला लँड्स लाईड आणि जोरदार पावसामुळे रेस्क्यूमध्ये अडचण निर्माण होत आहे. .
इर्शाळगडाच्या पायथ्याशी इर्शाळवाडी गाव आहे. आणखी खालच्या बाजुला चौक नावाचे गाव आहे. नेताजी पालकर यांचे मुळ गाव आहे. इर्शाळगडच्या पायथ्याला असलेल्या या वाडीत प्रामुख्याने आदिवासी समाजाची वस्ती आहे.
इरसालवाडी गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तात्काळ इरशाळगड येथील दुर्देवी घटनेचा आढावा घेतला. त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घटनास्थळाला जाण्याची शक्यता आहे.