प्रेस मीडिया लाईव्ह :
आम आदमी पार्टी हडपसर च्या वतीने पुणेकर (PMPML ) प्रवाशांना बस मद्ये प्रवास करत असताना PMPML च्या नादुरुस्त असलेल्या बसेस मधून प्रवास करावा लागतो, याची जाणीव होताच आम आदमी पार्टीच्या ' रस्ते व सार्वजनिक वाहतूक, विभागाने पुणे स्तरावर एक मोहिम आयोजित करून महिना उलटला आहे, याच मोहिमेचा पुढचा भाग म्हणून आज दिनांक 30 जुलै रोजी आम आदमी पार्टी हडपसर च्या वतीने ‘हडपसर गाडीतळ या ठिकाणी PMPML बसेस तपासण्यात आल्या व नागरिकांना पत्रके वाटून त्यांनी देखील बस तपासाव्यात असे आहवान करण्यात आले. तपासणी दरम्यान बऱ्याच बसेस मध्ये सुविधांचा अभाव आणि काही सुविधा अस्तित्वात नसल्याचे निष्पन्न झाले आहे !
बऱ्याच बसेस मध्ये अग्निशामक यंत्र अस्तित्वात नाही, तर काही बसेस मध्ये मेडीकल साहित्य नाही. काही बसेस मध्ये अग्निशामक यंत्र आहे पण ते अकार्यक्षम स्वरूपात आहे, तर काही बसेस मधून पत्रे कापले गेल्या मुळे प्रवाशांना इजा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशा परिस्थितीत बिघाड असलेल्या PMPML बसेस रस्त्यावर उतरुन PMPML प्रशासन काय साध्य करू पाहतंय ? असा प्रश्न आम आदमी पार्टी, हडपसर च्या वतीने विचारण्यात आला !
प्रत्येक पुणेकर प्रवाशाने एक बस चे इन्स्पेक्शन करावे व त्या बस मध्ये काही सुविधा नसल्यास किंवा ती बस नादुरुस्त असूनही PMPML प्रशासन तिला रस्त्यावरती उतरून प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे असे निदर्शनास येताच त्या बसचे फोटो आणि बस चा क्रमांक आम आदमी पार्टीच्या ' रस्ते व सार्वजनिक वाहतूक विभागाने जारी केलेल्या 8484874074 या क्रमांकावर संबंधित बसचे फोटो डिटेल्स सहित व्हॉट्सॲप वरती पाठवण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे. हडपसर च्या गाडीतळ परिसरात आज दिनांक 30 जुलै सकाळी १0 वाजता हा कार्यक्रम पार पडला !
या मोहिमेत हडपसर वॉर्ड समन्वयक सचिन कोतवाल, अस्मिता मांढरे, विजय साठे, महेश सूर्यवंशी, रवि लाटे, बालाजी कंठेकर, शुभम हांगे तशेच खूप मोठ्या प्रमाणात बस प्रवाशी सहभागी होते.