प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) दिन रविवार दि. १६ जुलै रोजी जगभर साजरा केला जाणार असून त्याचे औचित्य साधून Neuflex Talent Solutionsच्या वतीने 'AI'yo Tools या डॉ. अमेय पांगारकर यांनी लिहलेल्या पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात लेखक श्री. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते होणार आहे.
हा कार्यक्रम *रविवार दि. १६ जुलै २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. सहकारनगर येथील पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात* होणार आहे. 'AI'yo Tools या पुस्तकात १०१ कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधनांचे संकलन डॉ. अमेय पांगारकर यांनी केले आहे. पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम हा देखील एकप्रकारे अनोखा असणार आहे. Neuflex Talent Solutionsचे प्रमुख डॉ. भूषण केळकर "कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. अमेय पांगारकर या पुस्तकाचा प्रवास आणि या साधनांची नजीकच्या भविष्यातील गरज याबद्दल आपली मते मांडतील. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काही साधनांचा यशस्वी वापर केलेल्या पुण्यातील काही तरुणांचे अभिनंदन देखील या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात Metaverse, Augmented Reality, NFT, Drones या तंत्रज्ञानांचा वापर करून पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
QR codes चा वापर करत ही साधने कशी वापरावी, या साधनांद्वारे काय - काय करता येईल, त्यांची साधारण किंमत काय आहे, अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून मिळणार आहेत.
या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी आवश्यक: https://bit.ly/3reR3ct
अधिक माहितीसाठी संपर्क: ९७६२२४२६६२