प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही ना काही कारणामुळे पुढे पुढेच जात होत्या . या बाबत राज्य निवडणूक आयोगाने एका राजपत्रामध्ये निवडणुकीचा उल्लेख केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका यासाठी मतदार याद्या अंतिम करण्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने सूचना देण्यात आल्या आहेत.
Tags
पुणे