PMPML च्या अजब गजब कारभारा विरोधात आम आदमी पार्टी हडपसर च्या वतीने प्रवाशांना सोबत घेऊन PMPML ला सुधारण्याची अनोखी मोहीम

       



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : आम आदमी पार्टी हडपसर च्या वतीने पुणेकर (PMPML ) प्रवाशांना बस मद्ये प्रवास करत असताना PMPML च्या नादुरुस्त असलेल्या बसेस मधून प्रवास करावा लागतो,  याची जाणीव होताच आम आदमी पार्टीच्या ' रस्ते व सार्वजनिक वाहतूक, विभागाने पुणे स्तरावर एक मोहीम आयोजित केली आहे . 

या मोहीम अंतर्गत प्रत्येक पुणेकर प्रवाशाने एक बस चे इन्स्पेक्शन करावे व त्या बस मध्ये काही सुविधा नसल्यास किंवा ती बस नादुरुस्त असूनही PMPML प्रशासन तिला रस्त्यावरती उतरून प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे असे निदर्शनास येताच त्या बसचे फोटो आणि बस चा क्रमांक आम आदमी पार्टीच्या ' रस्ते व सार्वजनिक वाहतूक विभागाने जारी केलेल्या 8484874074 या क्रमांकावर संबंधित बसचे फोटो डिटेल्स सहित व्हॉट्सॲप वरती पाठवण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे ..   हडपसर च्या गाडीतळ परिसरात आज दिनांक १६ जुलै सकाळी ११ वाजता या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला, आणि अजून काही मुद्दे जशे की एका बस मध्ये किती बसलेले आणि किती उभे प्रवासी बसू शकतात याची माहिती लिहावी , असे काही मुद्दे उपस्थित केले. 

आता पुणेकर बस प्रवाशीच PMPML चा सुरू असलेला अजब गजब कारभार सुधारतील अशी अपेक्षा 'आम आदमी पार्टी, च्या रस्ते व सार्वजनिक वाहतूक विभागाने, व्यक्त केली आहे.  या मोहिमेत संबंधित नादुरुस्त असलेल्या बसचे फोटो आम आदमी पार्टीला  मिळाल्या नंतर ते फोटो PMPML प्रशासनाला पाठवले जातील व संबंधित तक्रार निवारण करण्यासाठी कळविले जाईल. या मोहिमेला यशस्वी बनवण्यासाठी पुणे शहरातील सर्व  आम आदमीचे कार्यकर्ते कार्यरत असून आज हडपसर गाडीतळ या ठिकाणी PMPML च्या बसेस मध्ये जाऊन व बस थांबा वरती उभे असलेल्या PMPML च्या या मोहिमेबद्दल माहिती देण्यात आली आणि या मोहिमेत प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले . 


या कार्यक्रमासाठी आम आदमी पार्टीचे  रस्ते व सार्वजनिक वाहतूक अध्यक्ष सेंथील अय्यर, हडपसर समन्वयक श्री. सचिन कोतवाल,  पुणे शहर महिला संघटक सौ. प्राजक्ता देशमुख , हडपसर गाव वॉर्ड चे अध्यक्ष श्री. स्वप्नील गोरे, स्थानिक पदाधिकारी श्री कनिष्क जाधव, श्री. रवी लाटे, शशिभुषण होले, महेश सूर्यवंशी, बालाजी कंठेकर यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post