कौशिक आश्रम व अक्षय सेवा संशोधन प्रतिष्टानच्या वतीने रक्तदान रक्तदान शिबिर संपन्न

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : कौशिक आश्रम व अक्षय सेवा संशोधन प्रतिष्टानच्या वतीने रविवार दिनांक १६ जुलै २०२३ रोजी रक्तदान शिविराचे कौशिक आश्रम येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ३१४ बाटल्यांचे संकलन झाले. हे शिबिराचे १९ वे वर्ष आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्व सरसंघचालक प.पू. रज्जुभैय्या यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.


अक्षय सेवा संशोधन प्रतिष्टान आणि कौशिक आश्रम या संस्थांचे संस्थापकीय विश्वस्त स्व. दादासाहेब आपटे पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे आणि अच्युतराव कोल्हटकर व प.पू. रज्जुभैय्या यांचे स्मृतिस अभिवादन करून या शिबिराचे उद्घाटन झाले . रा.स्व. संपाचे चतुर्थ सरसंघचालक म्हणून राजेंद्रसिंह उपाय रज्जुभैय्या यांनी आपल्या परिश्रमाने व समर्पित वृत्तीने संघटना बळकट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आपले सर्व जीवन त्यांनी देशासाठी समर्पित केले. २००० ते २००३ या काळात पूजनीय रज्जूभैय्या कौशिक आश्रम या वास्तूत निवासास होते. तेच त्यांनी आपले घर मानले व तेथेच त्यांनी १४ जुलै २००३ रोजी अंतिम श्वास घेतला. त्यांचे स्मृतिप्रित्यर्थ २००४ साला पासून हे रक्तदान शिबीर सुरु करण्यात आले. अनेक रक्तदात्यांचा या शिबिरास उदंड प्रतिसाद लाभला आहे.

या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रविन्द्र जी उटगीकर (Vice President Customer Strategy & Marketing - Praj Industries Ltd.), सौ. संगीता नरेश मित्तल (रांचालिका मित्तन ग्रुप

), डॉ. मिलिंद जगताप (Chief Mentor & Chairman of Soft Hard Automation Pvt. Ltd. & group) हे लाभले होते.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. उटगीकर यांनी रज्जूभैय्या यांचे जीवनातील अनेक प्रसंगाचे स्मरण करून रज्जूभैय्या यांच्या स्मृतिदिनानिमित्त होणा-या या रक्तदान शिबिरास शुभकामना व्यक्त केल्या. सौ. संगीता मित्तल

यांनी देखिल यावेळी मनोगत व्यक्त केले. डॉ. मिलिंद जगताप यांनी देखिल मनोगत व्यक्त करताना या सामजिन कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.

या कार्यक्रमात कौशिक आश्रम व अक्षय सेवा संशोधन प्रतिष्टान यांचे सर्व विश्वस्त व नागरीक बंधू भगिनी उपस्थित होते. अतिशय चांगल्या वातावरणात हे शिबीर संपन्न झाले. कौशिक आश्रम व अक्षय सेवा संशोधन प्रतिष्टान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे यांनी आयोजन केले.

Post a Comment

Previous Post Next Post