प्रेस मीडिया लाईव्ह :
कोरोनाने पतीचे निधन झाल्यानंतर एकाकी पडलेल्या महिलांचा संसार पुन्हा नव्याने उभं करण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरात उदयकाळ फाउंडेशन व कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या माध्यामातून राज्यात काम सुरु झाले. राज्यात कोविड मुळे एकल झालेल्या ५८०५ महिला समितीच्या थेट संपर्कात आहेत तर पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील २८५ महिलांसोबत उदयकाळ फाउंडेशन कार्य करत आहे.
पतीच्या निधनाने एकाकी पडलेला संसाराचा गाडा हा महिला खंबीरपणे निभावत आहे. यासर्व मध्ये प्रत्येकाचं दुख हे खूप वेगळे आहे. पती निधनाने कुटुंब हे देखील महिलेचे नसते हे प्रत्यक्ष महिलांसोबत काम करत असतांना लक्षात आले. उदयकाळ फाउंडेशन या संस्थेने सर्व महिलांचे संघटन तयार केले. त्यांना येणाऱ्या सामजिक व आर्थिक अडचणी समजून घेऊन त्यांना मदत देण्याचे काम सुरु केले. आज यापैकी ३१ महिलांना अत्यधुनिक शिलाई मशिन व्यवसाय करण्यासाठी दिले. त्यामुळे घरी राहून महिला व्यवसाय करु लागले. महिलांना शासकीय योजनेची माहिती सांगून कागदपत्रे कुठून कसे काढायचं, अर्ज कुठे, कसा, कोणाकडे करायचं हे सांगून आज संजय गांधी निराधार योजने अंतर्गत ६१ महिलांना महिना १ हजार लाभ मिळतो आहे. बालसंगोपन योजना हि महिला व बाल कल्याण विभागा अंतर्गत राबविण्यात येते त्यात ६८ महिलांच्या मुलांच्या पालन पोषणासाठी महिना ११०० रुपये लाभ प्रत्यक्ष लाभार्थीला मिळतो. कोविड मुळे एकल झालेल्या महिलांना सानुगृह मदत राज्य शासनाने जाहीर केली होती त्यात १६३ महिलांच्या खात्यात ५० हजार रक्कम लाभ मिळाला. रोजगार व स्वयंरोजगार करण्यासाठी बचतगट स्थापन केले त्यात ८० महिला सदस्य आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका सामाजिक विभागा अंतर्गत महिलांना आर्थिक मदत करण्यात येते त्यात ६६ महिलांना लाभ मिळाला आहे. केंद्र सरकारने मुलांच्या शिक्षणासाठी बाल न्याय निधी १० हजार जाहीर केला होता त्यात ६ महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी लाभ मिळाला आहे. विविध सामजिक संस्थेच्या मदतीने ७९ महिलांना मुलांच्या शिक्षणासाठी व रोजगार करण्यासाठी मदत केली .
त्याचं प्रमाणे महिलांच्या पुढील शिक्षणासाठी विविध कौशल्य उपक्रमाची माहिती देऊन महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यात महिला प्रामुख्याने ब्युटी पार्लर, शिलाई प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण असे विविध प्रकारचे शिक्षण महिला घेत आहे. यातून महिलांना उदयकाळ सावित्री महिला बचतगट स्थापन करून कापडी पिशवी शिवण्याचे काम सुरु केले. कापडी पिशवी शिवण्याचे काम महिलांना मिळाल्यास महिला अधिक काम करु शकतील आणि आर्थिक सक्षम होतील. महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आजही गरज आहे. अनेक महिलांना घरातून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे संघर्ष करावा लागत आहे. सामजिक जबाबदारी म्हणून समाजाने पुढे येऊन मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य केले पाहिजे.