प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष पुणे शहराच्या वतीने आज नानापेठ येथे पुणे शहरातील पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आ सचिनजी अहिर पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्रजी मिर्लेकर , उपस्थित होते .
महाराष्ट्रातील चालू घडामोडी आणि आगामी वाटचाली विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी बोलताना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यासोबत सामान्य जनता असून गद्दारी करून गेलेल्या मिंध्ये गटाची सध्याची सरकार मधील अवस्था वाईट झाली असून आज निष्ठावान सैनिकांना आपण मातोश्री सोबत असल्याचा अभिमान वाटतो, पुणे शिवसेनेची आक्रमकता पाहता पुणे शहरातील शिवसैनिकांचे कौतुक वाटते असे बोलले .
तर रवींद्र मिर्लेकर यांनी पक्षबांधणी विषयावर भर देण्यासाठी तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार लोकांपर्यंत घरा घरात पोहचविण्याचे काम आता प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे असल्याचे म्हणाले .
यावेळी लोकजनशक्ती पार्टीचे पुणे अध्यक्ष आदिनाथ भाकरे, रुपेश ओव्हाळ , विनोद कसबे इतर कार्यकर्ते आणि दांडेकर पूल भागातील सामाजिक कार्यकर्ते आदर्श ननावरे यांनी त्यांच्या साथीदारांसोबत शिवसेना पक्षात प्रवेश केला .
यावेळी व्यासपीठावर शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे , गजानन थरकुडे, मा आ महादेव बाबर , युवासेना सहसचिव मोहसीन शेख, प्रशांत बधे, दिलीप तांबोळी , पृथ्वीराज सुतार , बाळा ओसवाल, अमोल देवळेकर , गजानन पंडित , विशाल धनवडे, अशोक हरणावळ, महिला आघाडीच्या सविता मते , कल्पना थोरवे , पल्लवी जावळे युवा सेनेचे रेणुका साबळे ,राम थरकुडे , युवराज पारीख , निकता मारटकर, अनंत घरत , किशोर राजपूत , राजेश मोरे, भारत कुंभारकर, नंदू येवले , नितीन रावलेकर, बाळासाहेब मालुसरे, मकरंद पेठकर , अजय परदेशी , उत्तम भुजबळ , राहुल जेकटे , नितीन दरेकर , सुरज लोखंडे , नितीन वाघ , जान मोहम्मद, राजेश शेलार , तानाजी लोणकर , मदन गाडे, योगेश मोकाटे, पुरुषोत्तम विटेकर, इतर असंख्य शिवसैनिक महिला पदाधिकारी , युवा युवती सेना पदाधिकारी उपस्थित होते .