मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अतुलनीय धाडसाची दखल घेत लेजपाल जवळगे आणि त्याच्या दोन मित्रांना पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले.



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  एका तरुणीला कोयता गँगच्या तावडीतून वाचविणाऱ्या लेजपाल जवळगे याच्यावर  महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. लेजपाल जवळगे  याच्या धाडसाचे कौतुक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले तर, महादेव जानकर यांच्या पक्षाने लेजपाल जवळगे याचे पालकत्व घेतले.

जानकर यांनी  लेजपाल यश यूपीएससीत यश मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अतुलनीय धाडसाची दखल घेत लेजपाल जवळगे आणि त्याच्या दोन मित्रांना पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले. तसेच, त्या पीडित तरुणीलाही पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले .

Post a Comment

Previous Post Next Post