प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : ३५ वा पुणे फेस्टिव्हल यंदा दि. १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत दिमाखदारपणे संपन्न होणार आहे. त्याची पूर्वतयारी व नियोजन यासाठी पुणे फेस्टिव्हलच्या संयोजन समितीची विस्तृत बैठक पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल व सर्व समित्यांचे प्रमुख उपस्थित होते. कलाकारांचे कार्यक्रम, पाहुणे, निमंत्रणे, मंच सजावट, पार्किंग, व्हीआयपी रिसेप्शन, हॉटेलमधील निवास, पोलीस परवानगी, क्रीडा स्पर्धांचे नियोजन, महिला महोत्सव व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, प्रसिध्दी आदि विविध समित्यांच्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. अॅड अभय छाजेड यांची मुख्य संयोजक (Chief Coordinator) म्हणून नेमणूक केल्याचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी जाहीर केले. पुणे फेस्टिव्हलच्या स्थापने पासून सलग ३५ वर्षे पुणे फेस्टिव्हलशी जोडल्या गेलेल्या पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमा मालिनी यांचा दरवर्षी प्रमाणे यंदा देखील मोठा सहभाग असेल असे सुरेश कलमाडींनी नमूद करून सर्व पूर्वतयारी बद्दल समाधान व्यक्त केले.
सोबत फोटो
फोटो ओळ – (डावीकडून) रवींद्र दुर्वे, बाळासाहेब लांडगे, मंजिरी धामणकर, दिपाली पांढरे, करुणा पाटील, अनुराधा भारती, राधिका कुलकर्णी, संयोगिता कुदळे, सुप्रिया ताम्हाणे, राजन नायर, सचिन साळुंखे, अॅड. अभय छाजेड, कश्यप चुडासमा, बाबू नायर, मा.सुरेश कलमाडी, कृष्णकुमार गोयल.