सब ज्युनियर बॅाईज महाराष्ट्र स्टेट बॅाक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये राजवीर अमित सूर्यवंशीला सुवर्णपदक



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : महाराष्ट्र बॅाक्सिंग असोसिएशन आणि ॲमॅच्युअर बॅाक्सिंग असोसिएशन (नागपुर जिल्हा) यांच्या संयुक्त विद्यमाने  झालेल्या '९ व्या सब ज्युनिअर बॅाईज महाराष्ट्र स्टेट  बॅाक्सिंग चॅम्पियनशिप २०२३-२४'मध्ये  पुणे सिटी संघाच्या  राजवीर  अमित सुर्यवंशीने   चुरशीच्या लढतीत  दणदणीत विजय मिळवला आणि सुवर्णपदक पटकावले.१४ वर्षाखालील वयोगट असलेल्या या स्पर्धेत राजवीर अमित सुर्यवंशी याने ४९-५२ या वजनगटात पुणे सिटीचे प्रतिनिधीत्व केले.एम.आय.जी.एस.क्लब चे प्रशिक्षक उमेश जगदाळे, राष्ट्रीय खेळाडू मृणाल भोसले आणि रोहन जगदाळे यांचे  मार्गदर्शन लाभले.एड.रुपाली पाटील-ठोंबरे,महादेव हणमंतराव सूर्यवंशी,संजीव गोडसे,शरद कंक,जयसिंग पाटील यांनी राजवीरचे अभिनंदन केले.ही स्पर्धा २२ ते २६ जुलै दरम्यान नागपुर येथे पार पडली.  




Post a Comment

Previous Post Next Post