प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : जेजुरी नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक महेबुब पानसरे यांच्यावर चार ते पाच जणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात पानसरे गंभीर जखमी झाले.त्यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथील रुग्णआलयात दाखल करण्यात आलं असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.त्यांची हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
वनेश प्रल्हाद परदेशी, किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. शेतजमिनीच्या वादातून पानसरे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
मेहबूब पानसरे यांच्या मृत्यूमुळे जेजुरीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झालीय. मेहबूब पानसरे यांच्या कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे आरोपींविरोधात जेजुरीत संताप व्यक्त केला जातोय. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.