प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यामध्ये एका तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्यामध्ये मुलीचे प्राण वाचवणारे निर्भिड तरुण लेशपाल जवळगे यांचा कौतुक सोहळा आज आम आदमी पार्टी पुणे शहर च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुष्पगुच्छ व अकरा हजार रुपये कौतुक सन्मान राशी आम आदमी पार्टी तर्फे लेशपाल यांना प्रदान करण्यात आली.
यावेळी लेशपाल जवळगे यांनी दाखवलेल्या असामान्य कर्तबगारीचे आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांकडून कौतुक करण्यात आले. समाजातल्या प्रत्येक तरुणाने लेशपाल यांचा आदर्श घ्यावा व लेशपाल ही आता व्यक्ती नसून संस्था झाली आहे अशी भावना आम आदमी पार्टीचे पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी व्यक्त केली.
यावेळी लेशपाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा इतिहास म्हणून न शिकवता मूल्य शिक्षण म्हणून शिकवावे व प्रत्यकाने आपली जवाबदारी हि कृतीतून पार पाडावी अशी भावना व्यक्त केली.
आम आदमी पार्टीचे नेते अजित फाटके यांनी यावेळी लेशपाल सारखे तरुण प्रत्येक समाजात उभे राहिले पाहिजे अशी भावना व्यक्त केली. पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी समाजामध्ये महिलांप्रती वैचारिकता बदलण्याची गरज आहे आणि ती पुरुष वर्गाकडून झाली पाहिजे असे वक्तव्य केले.
यावेळी आम आदमी पक्षाच्या महिला अध्यक्षा सुनीता काळे यांनी लेशपाल जवळगे यांचे कौतुक करून लेशपाल सारख्या तरुणांमुळे महिलामध्ये सुरक्षितेची भावना निर्माण होते असे मत व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्र संचालन निलेश वांजळे यांनी केले याप्रसंगी आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.