पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दर सोमवारी साप्ताहिक बैठक होणार. - अरविंद शिंदे, अध्यक्ष-पु.श.काँ.क.



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आज काँग्रभवन येथे जाहिर केले की, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी सायं. ४.०० वा., काँग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे येथे साप्ताहिक बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.

  

या बैठकीस काँग्रेसचे आजी माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी व प्रतिनिधी, आजी माजी नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, विविध विभाग व सेलचे अध्यक्ष, महिला, युवक , विद्यार्थी संघटना आदी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. सदर साप्ताहिक बैठक सोमवार दि. १० जुलै २०२३ रोजी सायं. ४.०० वा., काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

    

 सदर बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा व पुणे महानगरपालिका निवडणुकी संदर्भात चर्चा विनिमय होणार आहे. अशी माहिती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या पत्रकाद्वारे दिली आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post