प्रेस मीडिया लाईव्ह:
कोल्हापूर : काल महाराष्ट्राचा राजकारणात अजून एक भ्रष्टाचाराचा भूकंप झाला प्रत्येक भ्रष्टाच्याऱ्याला आम्ही पक्षात घेऊ आणि त्याच्यावरची कार्यवाही बंद करू अशा पद्धतीने भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रात जे गलिच्छ राजकारण सुरू केले आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील 13 करोड जनतेवर होत आहे आणि दूरपर्यंत होणार आहे, संविधानाची पायमल्ली करून आपल्याला सोईस्कर होईल या पद्धतीने कायद्याची तोडमोड करून सत्ता कशी ताब्यात घेता येईल हे भाजपा करीत आहे, अनेक आमदार आणि खासदारांच्या बाबतीत भाजपा षडयंत्र करून, पैसा देऊन, ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून आज महाराष्ट्रातील तमाम भ्रष्टाचाऱ्याना बीजेपी आपल्या पार्टीत घेत आहे.
शिंदे, राणे, अजित पवार असे वेगवेगळे मोहरे वेगवेगळ्या आघाडीवर पाठवून मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस त्यांना व्यवस्थीत हाताळत आहेत, भ्रष्टाचाराने माखलेले चेहरे घेवून भाजपा देश्यात अस्थिरता निर्माण करीत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या घटनांमुळे संतप्त व दु:खी झालेल्या जनतेने हे जाणून घेतल पाहिजे की भारतातील पारंपरिक पक्षांचे नेते जनतेच्या सेवेसाठी राजकारणात नाहीत. ते सत्ता, भ्रष्टाचार, प्रसिद्धी, आर्थिक फायद्यासाठी राजकारणात आहेत
ते विचारधारा, पक्ष किंवा लोकांशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत. ते लोक सेवेमुळे नाही तर त्यांच्या जाती, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि पैशाच्या ताकदीमुळे निवडून आले आहेत. अशा राजकारण्यांना भाजपा ईडी, सीबीआय, आयटीच्या रडारखाली वाकवून पक्ष बदलण्यास किंवा आपल्याला सपोर्ट करण्यास भाग पाडत आहे.
परंतु महाराष्ट्रातील जनतेला "आम आदमी पार्टी" म्हणजे आशेचा किरण आहे, आप एकमेव असा पक्ष आहे जो सीबीआय आणि ईडीच्या चुकीच्या कार्यवाहीनंतरही अखंड आणि वैचारिकदृष्ट्या एकजूट आहे. चिखलाच्या राजकारणात आदर्श म्हणून उभे राहण्याची फक्त आप कडे ताकद आहे, महाराष्ट्राच्या जनतेला सुगीचे दिवस फक्त आम आदमी पार्टीच आणू शकते, कारण भ्रष्ट राजकारणात आप सारखा एकमेव प्रामाणिक पक्ष हा लोकांचे भले करू शकतो आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली आणि पंजाब मध्ये आप ने जे सामान्य लोकांसाठी काम करून दाखविले आहे तोच जनतेसाठी मोठा पुरावा आहे.