राजकीय ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांचा दावा
ज्योतिष ज्ञान दिवाळी अंकातील भाकित
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : राज्यातील उलथापालथीचे 'ज्योतिष ज्ञान' २०२२ च्या दिवाळी अंकात वर्तवलेले भाकित खरे ठरले आहे , असा दावा राजकीय विषयातील तज्ज्ञ ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे केला आहे.
'ज्योतिष ज्ञान' हा ज्योतिषाला वाहिलेला वार्षिक दिवाळी अंक आहे . सिद्धेश्वर मारटकर हे या दिवाळी अंकाचे संपादक आहेत. २०२२ च्या 'ज्योतिष ज्ञान दिवाळी अंकातून जून -जुलै २०२३ मध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत भाकीत वर्तवले होते . 'मोठा पक्ष फुटेल, राजकीय उलथापालथ महाराष्ट्रात होईल, मोठा पक्ष फुटून मोठा गट सत्तेत सामील होईल.एक विचित्र समीकरण सत्तेमध्ये तयार होईल. मोठया पदावरील व्यक्तींना राजीनामा द्यावा लागेल ',असे निःसंदिग्धपणे त्यांनी सांगितले होते
यापूर्वी उद्धव ठाकरे २०१९ मध्ये मुख्यमंत्री होतील.हे भाकीत सुद्धा वर्षभर आधी वर्तविले होते.तर जून २०२२ मध्ये ठाकरे सरकार अडचणीत येईल याचे भाकीत सुद्धा २०२१ च्या दिवाळी अंकातून वर्तविण्यात आले होते.
यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावेळी ' विद्यमान सरकारचा काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती. न्यायालयाचा निकाल शिंदे-फडणवीस यांच्या बाजूने लागेल आणि निलंबनाबाबत चा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला जाईल',असे भाकीत मारटकर यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात वर्तवले होते.
कर्नाटक निवडणुकीबाबत वर्तविलेली भाकिते सुद्धा खरी ठरली आहेत,असे मारटकर यांनी या पत्रकात सांगितले आहे.