प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : मणिपूर मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात पुणे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज अभिनव कॉलेज , टिळक रोड येथे भाजप केंद्र व मणिपूर राज्य सरकारच्या विरोधात निषेधार्थ आंदोलन करण्यात आले .
यावेळी भाजपच्या स्वयंघोषित नेत्या स्मृती इराणी , चित्रा वाघ , ह्याना आता महिलांवर होणारे अत्याचार दिसत नाही का ? ५६ इंच वाल्याना देशातील महिलांची अवस्था दिसत नाही का ? असा सवाल शिवसेना महिला आघाडीच्या वतीने विचारण्यात आला .
यावेळी बोलताना शहर संघटीका सविता मते म्हणाल्या भाजपा सरकार मध्ये महिला असुरक्षित आहे महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहे , गृहखात सक्षम नाही मणिपूर मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा . नगरसेविका पल्लवी जावळे म्हणल्या केंद्र सरकार सक्षम नाही कारवाई करण्यास 70 उलटून दिवस गेले मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा राष्ट्रपती राजवट लागु करावी.
नगरसेविका संगीता ठोसर म्हणाल्या लवकर दोषींवर कारवाई करावी कडक शिक्षा करण्यात यावी.
सदर आंदोलनाला शहर संघटीका सविता मते , शहर संघटीका मा. नगरसेविका पल्लवी जावळे ,संगीता ठोसर उपशहर संघटीका पदमा सोरटे, प्रज्ञा लोणकर ,करूणा घाडगे , विद्या होडे, सुलभा तळेकर ,रोहिणी कोल्हाल, दिपाली राऊत , वैशाली दारवटकर, अनुपमा मांगडे , भारती भोपळे, अश्विनी म्हलारे, स्वाती रणपिसे ,माया भोसले, सुनिता रानवडे ,सुरेखा शेळके, दिपाली शिगवण, भाग्यश्री सागवेकर, गौरी चव्हाण, नमिता चव्हान, प्रियांका जव्हेरी भारती जाधव ,भारती दामजी ,संगीता भिलारे ,सविता गोसावी ,सविता परदेशी ,अरुणा पवार ,अश्विनी शिंदे ,मनीषा गरुड, उज्वला भालके , युवती अधिकारी निकिता मारटकर मृण्मयी लिमये ,पुजा चांदगुडे, नेहा गुरव, देविका घोसरे, रोहिणी मडोळे ई उपस्थीत होते.