पुणे शहर काँग्रेसच्या वतीने किरीट सोमय्या यांचे वस्त्रहरण.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या प्रसार माध्यमात प्रसिध्द झालेल्या आक्षेपार्ह व्हिडिओ विरोधात टिळक रोड, ग्राहक पेठ समोर आंदोलन करण्यात आले.

   

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘सातत्याने आपल्या विरोधकांवर बेछूट आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांचा खरा चेहरा आक्षेपार्ह व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांसमोर आला आहे. स्वत:ला चारित्र्यवान समजणारे किरीट सोमय्या यांचे चारित्र्यहीन दर्शन जनतेला झाले असून स्वच्छ प्रतिमेचे दाखले देणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी या प्रकरणी सोयीस्कर मौन बाळगले आहे. महिला वर्गावर सातत्याने अत्याचार व अपमान करणाऱ्या भाजप सरकारचा या आंदोलनाद्वारे आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व सोमय्या यांच्या या गलीच्छ कृतीबद्दल त्यांच्यावर उचित कायदेशीर कारवाई व्हावी.’’

   

  यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, नीता रजपूत, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, अजित दरेकर, रफिक शेख, मेहबुब नदाफ, सुजित यादव, रमेश सकट, रविंद माझीरे, अक्षय माने, रजनी त्रिभुवन, सुंदरा ओव्हाळ, सीमा महाडिक, छाया जाधव, प्रकाश पवार, अश्विनी गवारे, सतिश पवार, सुनिल घाडगे, रमेश सोनकांबळे, अजित जाधव, रवि ननावरे, समीर गांधी, हेमंत राजभोज, आसिफ शेख, संतोष पाटोळे, विकी खन्ना, विशाल जाधव, बळीराम डोळे, संजय मोरे, लतेंद्र भिंगारे, संतोष डोके, शिवराज भोकरे, राहुल वंजारी, विल्सन चंदवेल, आशितोष शिंदे, नैनाताई सोनार, वंदना पोळ, मुक्ता शिंदे, संगीता कंधारे, नंदीनी कवडे, लीला भायगुडे, शोभा भगत, अनिता भायगुडे, सुविधा त्रिभुवन आदी उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post