चित्रपट वार्ता : क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड माहिती पटाचा स्क्रीनिंग सोहळा संपन्न

 चित्रपट वार्ता  



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे: डॉ. तुषार निकाळजे यांनी लिहिलेल्या व निर्मिती केलेल्या "क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड"  या माहितीपटाचा स्क्रीनिंग सोहळा दिनांक २१  जुलै  २०२३  रोजी स्वर्गवासी राजीव गांधी ई- लर्निंग स्कूल, पर्वती, पुणे येथे संपन्न झाला. कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी व संशोधक उपस्थित होते.

 याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र खेडेकर म्हणाले, "डॉ.तुषार निकाळजे यांनी लिहिलेल्या व निर्मिती केलेल्या क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड या माहितीपटाचा भावी पिढीला निश्चितच उपयोग होईल. अशा प्रकारचे समाज उपयुक्त माहितीपट, लघु चित्रपट निर्मिती व्हावी अशी  अपेक्षा".   

     याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना या माहितीपटाचे  निर्माते व कथा  लेखक  डॉ. तुषार निकाळजे म्हणाले," क्लर्क हा समाज व्यवस्थेतील व शासकीय व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा आहे. नागरी सेवेतील या घटकाचा  महत्त्वाचा वाटा आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने क्लर्क या घटकाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. तसेच त्याच्या बौद्धिक संपदेची  प्रगती होण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे". या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल  किरवे यांनी केले. शिक्षण क्षेत्रातील काही मान्यवरांनी डॉ. तुषार निकाळजे यांनी क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड हा माहितीपट निर्मिती केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. 





Post a Comment

Previous Post Next Post