प्रेस मीडिया लाईव्ह :
आजचा दिवस महाराष्ट्रातील राजकारणाचा मोठा राजकीय भूंकपाचा ठरला आहे , अजित पवार यांनी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली , राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंत्री पदाची शपथ घेऊन सर्वाँना जोरदार धक्का दिला आहे . तर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना आनंद झाल्याचे चित्र दिसत आहे , कारण शिवसेनेशी गद्दारी करीत भाजपाशी हातमिळवणी करणारे एकनाथ शिंदे यांचे आता काही खरं नाही याचा जास्त आनंद शिवसेना नेत्यांना होताना दिसत होता .
शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीवर भाष्य करीत अजित पवार आणि त्यांचे साथीदार शपथ घेताना एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडल्याचे सांगत आता शिंदे यांची भाजपाला गरज नाही कारण हे सर्व 16 आमदार सुनावणीत अपात्र ठरणार म्हणून ही खेळी भाजपाने केल्याचा आरोप केला. आणि गेलेले आमदारही आता अपात्र ठरतील अशी भविष्यवाणी त्यांनी केली.