प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी चिंचवड - दिनांक १६ जुलै २०२३ (प्रतिनिधी) अखिल मराठी पत्रकार संस्था (रजि.) संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ कार्यकारिणी २०२३ ते २०२४ साठी निवडणूक घेण्यात आली असून निवडणुकीत अध्यक्ष पदी दादाराव_आढाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली . बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्था संस्थापक अध्यक्ष #बापूसाहेब_गोरे तर निवडणूक अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार संतलाल_यादव यांनी काम पाहिले.
पिंपरी चिंचवड शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आज सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या निवडनुकीसंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. निवडणुकीत पुढीलप्रमाणे कार्यकारणी बिनविरोध निवडण्यात आली.
अध्यक्ष दादाराव आढाव, समन्वयक #कलिंदर_शेख, उपाध्यक्ष #गणेश_शिंदे, विनय_लोंढे, सरचिटणीस , महेश_मंगवडे, कोषाध्यक्ष #बाबू_कांबळे,चिटणीस संजय_बोरा,अमोल_डंबाळे कार्यकारणी सदस्य #सायली_कुलकर्णी, संतोष_जराड, #जितेंद्र_गवळी, #श्रद्धा_कोतावडेकर_कामथे, विश्वास_शिंदे, मुकुंद_कदम तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून #युनूस_खतीब यांची निवड जाहीर झाली.
यावेळी पिंपरी चिंचवड डिजिटल मिडियाचे अध्यक्ष भीमराव तूरुकमारे पत्रकार संघाचे सदस्य प्रीतम शहा, सुहास आढाव, अल्ताफ शेख,उमेश जाधव,यशवंत गायकवाड,विनोद शिंदे,प्रसाद बोरसे,शफीक शेख इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर यांनी उपस्थित राहून निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा कोतावडेकर तर आभार जितेंद्र गवळी यांनी मांडले.
#9420554065