प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित जी. के. एन. (महिंद्रा सिंटर्ड) या बहुराष्ट्रीय कंपनीतील कामगारांनी १३ जुलै पासून कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारा विरुद्ध संप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या कंपनीत महिंद्रा सिंटर्ड कामगार संघटना दिवंगत कामगार नेते कॉम्रेड दादा रुपमय चॅटर्जी यांनी स्थापन केली आहे. मागील काही वर्षांपासून व्यवस्थापन कामगारांची पिळवणूक करीत आहे त्यामुळे संघटनेचे अध्यक्ष सदानंद टिळेकर आणि जनरल सेक्रेटरी निळकंठ मिरजगावे यांनी कामगार संपावर जाणार असल्याचे पत्र प्रसिद्धिस दिले आहे. पिंपरी चिंचवड आणि भोसरी औद्योगिक पट्ट्यात सुरुवातीच्या काळात ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आल्या त्यामध्ये महिंद्रा सिंटर्ड या कंपनीचा समावेश आहे. अलीकडच्या काळात महिंद्रा सिंटर्ड कंपनीचे नाव बदलून जी. के. एन. करण्यात आले. या कंपनीत टीयूसीसी या कामगार संघटनेशी संलग्न महिंद्रा सिंटर्ड कामगार संघटना कार्यरत आहे. या बहुराष्ट्रीय कंपनीत मागील काही वर्षांपासून व्यवस्थापन कामगारांची पिळवणूक करीत आहे. याविषयी कामगार संघटनेने यापूर्वी कामगार आयुक्त मुंबई, कामगार उपायुक्त पुणे आणि पिंपरी पोलीस स्टेशन यांना देखील पत्र दिले आहेत. कामगार संघटनेच्या या मागणीकडे कंपनी व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे. कामगारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
महिंद्रा सिंटर्ड कामगार संघटनेच्या वतीने प्रसिद्धिस देण्यात आलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, जी. के. एन. पिंपरी, ही एक बहुराष्ट्रीय कंपनी असून मागील काही वर्षांपासून व्यवस्थापन करीत असलेल्या विविध पिळवणुकीला कंटाळून जी. के. एन. पिंपरी प्लांटचे सर्व कामगार ही दि. १३ जुलै २०२३ पासून संपावर जाणार आहेत. कामगारांची विविध पातळीवर पिळवणूक व्यवस्थापन करीत आहे. जसे की, नवीन करार तर सोडाच पण मागील केलेल्या करारातील मान्य केलेल्या बाबी पण व्यवस्थापन पूर्ण करीत नाही. कंपनीतील अधिकारी नाहक कामगारांना दमदाटी तसेच दादागिरीची भाषा वापरत जादाचे काम करून घेत आहेत. कामगारांना विविध पातळ्यांवर शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक कोंडीत पकडून त्रस्त करण्यांत येत आहे. या जाचाला कंटाळून बरेच कामगार हे तोकड्या मोबदल्यावर नोकरी सोडून गेले. कामगारांना मानहानी कारक वागणूक दिली जात आहे. वेळोवेळी व्यवस्थापनास सांगून सुद्धा व्यवस्थापन मनमानी कारभार करीत आहे. या सर्व बाबींना कंटाळून संपावर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. या ठिकाणी टीयूसीसी संलग्न महिंद्रा सिंटर्ड कामगार संघटना कार्यरत आहे अशी माहिती पत्रात संघटनेचे अध्यक्ष सदानंद टिळेकर आणि जनरल सेक्रेटरी नीलकंठ मिरजगावे यांनी यांनी दिली आहे.
-------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क, सदानंद टिळेकर
+91 90110 22148