मंत्री एसी गाडी आणि मुले रस्त्यावर उन्हात
प्रेस मीडिया लाईव्ह
अमळनेर येथे मंत्री अनिल पाटील यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर बसवलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबत आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाला टॅग करीत सुमोटो पद्धतीने दखल घेत कारवाईची मागणी केली आहे.
ट्विटची दखल घेत मंत्री अनिल पाटील यांनी ' आश्रम शाळेच्या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही, असले प्रकार सहन केले जाणार नाही ' असे उत्तर आम आदमी पार्टी च्या ट्विटला दिले आहे.
राजकीय घडामोडी नंतर भाजप सरकारच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील मंत्री झाले. मंत्री पदाची शपथ घेतल्यांनंतर अनिल पाटील त्यांच्या अमळनेर मतदारसंघात गेले असता, त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा शाळकरी विद्यार्थ्यांना स्वागतासाठी उभे केल्याचा प्रकार समोर आला आहे.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने याबाबत कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. खारघर येथे उष्माघाताने अनेक जणांचा मृत्यू झाला होता या घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने मुलांना रस्त्यावर बसवणे धोकादायक होतेच शिवाय राजकीय हेतूसाठी मुलांचा वापर करणे अयोग्य असल्याने याबाबत संबंधित व्यक्तींवर कारवाई होण्याची गरज आहे. हे विद्यार्थी आश्रमशाळेतील असल्याने त्यांना कोणीच वाली नाही अशी परिस्थिती बरेच ठिकाणी आहे. त्यामुळे तेथील मुलांना अशी अयोग्य वर्तणूक दिली जाते असा आरोप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी या संदर्भात बोलताना केला.