महापालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष , जनतेतून संताप
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि उपनगरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढ़त चालली आहे.आता पर्यंत कितीतरी जणांचे या कुत्र्यांनी लचके तोडले आहेत. त्यामुळे शहरात नागरिकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र या प्रकरणाकडे कोल्हापूर महानगरपालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
अलीकडच्या काळात शहरात आणि उपनगरात भटक्या कुत्र्यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली असून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडुन दुर्लक्ष होत आहे.कोल्हापूर शहरात आणि ग्रामीण भागातुन कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात असून ते काम संपवुन रात्री अपरात्री आपलया घरी येत जात असताना भटकी कुत्री त्याचा पाठलाग करतात त्यामुळे भितीने गाडी चालविताना मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.तसेच वृत्तपत्र विक्रेते ,दुध विक्रेते ,भाजीपाला विक्रेते पहाटे पासूनच येत असतात.शहरात प्रत्येक भागात कुत्र्यांचा कळपच्या कळप भर रस्त्यात बसलेला असतो आणि येणारयां जाणाऱ्यांच्या पाठलाग करून भुंकत पळत सुटतो.
परवा वृ वृत्तपत्र विक्र्रेते किरण व्हनगुत्ते यांना भाऊसिंगजी रोड वर कुत्रे चावले असून बाईच्या पुतळ्या जवळ राजारामपुरी पोलिस ठाण्यातील पो.कॉ.मिलिंद मालाई यांनाही भटक्या कुत्र्यांने चावा घेऊन जखमी केले आहे.तरी भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतुन होत आहे.तसेच काही चिकन 65 या गाड्यावरही कारवाई करण्याची गरज आहे कारण काही चिकन 65 विक्रेते शहरात बेकायदेशीररित्या रस्त्यावर,चौकात रात्रीच्या वेळी चिकन 65 च्या गाड्या सुरु असतात काही विक्रेते वेस्टेज चिकन खाण्यासाठी भटकी कुत्री या हातगाड्याच्या आसपास घुटमळत असतात. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढ़ण्यास चिकन 65 वाले ही तितकेच कारणीभूत आहेत.अशा विक्रेतेच्यांवर आरोग्य विभाग कारवाई करण्याचे धाडस दिसत नाही.कारण अशा काही विक्रेत्याकडुन कदाचित हप्ता असण्याची शक्यता या निमीत्ताने जनतेतून व्यक्त केली जात आहे.तरी कोल्हापुर महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी जनतेतून मागणी होत आहे.