परराज्यातील खतरनाक गुंडाला कोल्हापूरात अटक

 स्थानिक गुन्हे अन्वेषण,कोल्हापुर आणि पंजाब पोलिसांची संयुक्त कारवाई.              



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर- अमृतसर ,पंजाब येथे खून आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्या अशा दोन गुन्हयात फरारी असलेला खतरनाक गुंड दिपक परवेझ ईश्वरसिंग (वय 32  रा.खरहार जि.झज्जर राज्य हरीयाणा ).याला आज स्थानिक गुन्हे अन्वेषण,कोल्हापुर आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

अधिक माहिती अशी की,पंजाब येथील पोलिसांना तेथील खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपी दिपक ईश्वरसिंग हा कोल्हापुरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्या वरुन पंजाब येथील पोलिस पथक  कोल्हापूरात येऊन कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने सदर आरोपी  रंकाळा परिसरात शोध घेत असताना दुधाळी येथे धुण्याची चावी येथे असल्याची माहिती मिळाली असून तो घातक शस्त्र जवळ बाळगत असल्याने पोलिसांनी ही पूर्ण तयारीनीशी जाऊन योग्य ती खबरदारी घेत अत्यंत हुशारीने त्या आरोपीस पकडून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव दिपक उर्फ अर्जुन उर्फ परवेझ उर्फ ढ़िल्लो ईश्वरसिंग राठी असल्याचे सांगितले.त्याने दोन्ही गुन्हयाची कबुली दिली आहे.

सदरचा आरोपी हा अमृतसर येथील "जगु भगवान पुरीया "या टोळीचा असून तो "लॉरेन्स बिष्णोई "या टोळी विरोधात काम करीत असल्याचे सांगून या टोळीला क्यानडा ,युएसए ,ऑस्ट्रौलिया येथुन आर्थिक मदत पुरविली जात असल्याचे सांगितले.या आरोपीने प्रतिस्पर्धी टोळीचा जनरलसिंग याला 24/5/23 रोजी गाडीतुन जात असताना त्याची गाडी अडवून गोळ्या घालून ठार मारले तर 21/5/23 रोजी रौनतसिंग उर्फ सोनू मोटा याला गोळ्या घालून गंभीर जखमी करून ठार मारण्याचा साथीदाराच्या मदतीने प्रयत्न होता.सदर आरोपी दोन्ही गुन्हे करून 2/6/23 पासून फरारी होऊन कोल्हापुरात नाव बदलून रहात होता.या आरोपींवर पंजाब राज्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्याला 10 वर्षे शिक्षाही झाली होती.

 ही कारवाई कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक मा.श्री.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पोलिस निरीक्षक श्री.महादेव वाघमोडे ,अमृतसरचे सीआयएचे पोलिस निरीक्षक श्री.अमरदिपसिंग आणि त्यांचे सहकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक शेष मोरे ,नितीन चोथे ,प्रशांत कांबळे,निवृत्ती माळी ,अनिल जाधव आणि नामदेव यादव यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post