प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- कोल्हापुरात कंळबा जेलात सुभेदार असलेला बाळासाहेब भाऊ गेंड (वय 55 ,रा .कंळबा ,मुळगाव पुणे) हे कामावर हजर होताना त्यांची तपासणी करताना गांजा मिळून आला.
या बाबतची तक्रार कंळबा कारागृहातील शिपाई महेश दिलीप देवकाते यांनी बाळासाहेब गेंड यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्या नुसार पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधान कारक उत्तरे दिली नसल्याने पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे अडीच किलो गांजासह रोख पन्नास हजार रुपये जप्त करून त्याला अटक करण्यात आली.आज न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.कंळबा कारागृहात राज्यभरातील कैदी असून त्यांना कोणते ना कोणते व्यसन असते.गेल्या काही महिन्या पासून काही कैद्यांमध्ये गांजा ,मोबाईल मिळून येत असल्याने त्या आधारे शोध मोहिम सुरु केली होती.कारागृहातील कर्मचारयांची ड्युटी वर येणारयांची तपासणी केली जाते आज या तपासणी वेळी सुभेदार असलेला बाळासाहेब गेंड याच्याकडे गांजा मिळून आला.अधिक तपास जुना राजवाडा पोलिस करीत आहेत.