महिलांच्या पर्स चोरणाऱ्या सराईत महिलेस अटक.

 

      


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

 कोल्हापुर-गर्दीचा फायदा घेत एसटी बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत प्रवासी महिलांना हिसडा मारुन सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत चोरट्या महिलेला शाहुपुरी पोलिसांनी आज अटक केली.अनघा अनंत जोशी (वय 62,जाधववाडी ,कोल्हापुर).असे तिचे नाव आहे.त्या महिलेने दोन गुन्हयांची कबुली दिली आहे.

सदर महिलेने 2 लाख 30 हजार रुपये किमतीचे दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.1 मे . रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा येथील व्यशाली यल्लापा कोटगी (वय 40).ही महिला आपल्या मुळ गावी जाण्यासाठी कोल्हापूर एसटी बस स्थानकावर आल्या होत्या.एसटीत चढ़ताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्यांनी लंपास केली होती.या महिलेने शाहुपूरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.शाहुपूरी पोलिसांनी सीसीटीव्ही फ़ुटेज द्वारे संशयीत महिलेचा छडा लावुन नाव निष्पन्न केले मात्र त्यामहिलेचा पत्ता सापडत नव्हता.पोलिसांची पथके तिच्या मागावर होती.

सदर महिला कोल्हापुर एसटी बस स्थानकात येणार असल्याचे समजले.ती महिला दिसताच तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने कोल्हापुरसह अन्य जि ल्हयात ही चोरी केल्याची कबुली दिली आहे.असे म्हस्केसो ,यांनी सांगितले.या गुन्हयात आणखी साथीदार असण्याची शक्यता असून यांचीही चौकशी करण्यात  येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post