केशवराव भोसले नाट्यगृह येथे खासबाग मैदानाची भिंत कोसळून एक महिला ठार तर एक जखमी

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

      कोल्हापूर - कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह येथे काल सायंकाळच्या सुमारास खासबाग मैदानाची भिंत कोसळून कदमवाडी येथील अश्विनी आनंदा यादव आणि वडणगे येथील संध्या प्रशांत तेली या संरक्षक भिंतीच्या ढ़िगारया खाली सापडल्या असता त्याना बाहेर काढून उपचारा साठी सीपी आर रुग्णालयात दाखल केले असता अश्विनी आनंदा यादव (वय 45 ,साई पार्क भोसलेवाडी रोड ,कदमवाडी)या महिलेचा उपचारा पूर्वी मृत्यु झाला.आणि दुसरी महिला संध्या प्रशांत तेली (वय 30 ,वडणगे) या गंभीर जखमी झाले आहेत. 

अधिक माहिती अशी की ,केशवराव भोसले नाट्यगृहात महिलांचा कार्यक्रम आयोजित केला होता.त्यामुळे आसपासच्या परिसरातुन महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या कार्यक्रमात हिंदी मराठी गाण्या सोबत लावणीचा कार्यक्रम असल्याने महिलांची संख्या लक्षणीय होती.ही घटना घडताच कोल्हापूर महानगरपालिका  अग्निशामन दलाच्या मदतीने जखमीना बाहेर काढ़ण्यात आले

.दरम्यान आमदार ऋतुराज पाटील ,यांच्यासह अनेकांनी घटना स्थळी भेट देऊन जखमीची विचारपूस केली.

Post a Comment

Previous Post Next Post