महापालिका शाळांमधील 68% स्वच्छतागृहे निकृष्ट

आप'च्या सर्व्हेमधून आले धक्कादायक निष्कर्ष समोर

वाजत गाजत जाऊन महापालिकेला अहवाल देणार- आप 




प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर महापालिका शाळांची परिस्तिथी सुधारावी यासाठी शाळांमधील भौतिक सुविधांचे ऑडिट करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने सातत्याने लावून धरली गेली होती. परंतु याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे अखेर आप ने सर्व महापालिका शाळांमध्ये जाऊन भौतिक सुविधांचा सर्व्हे केला.

महापालिकेच्या 58 शाळांच्या इमारतीची परिस्थिती, शाळेच्या परिसर व स्वच्छतागृहांची स्वच्छता, मैदानाची अवस्था, अतिक्रमण आदी मुद्दे या सर्व्हेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.25% इमारती निकृष्ट असून 9% टक्के इमारती पडण्याच्या स्थितीत आहेत.महापालिका शाळांमधील 78% स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत वाईट किंवा निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आले आहे. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आहे. पालिकेच्या 65% शाळांमधील पिण्याची पाणी पिण्यायोग्य नाही. साठलेले शेवाळ, गाळ, बंद पडलेले फिल्टर यामुळे विद्यार्थ्यांना अस्वच्छ पाणी प्यावे लागत आहे. 

53% शाळा ओपन ओपन बार झाल्याचे धक्कादायक बाब या सर्व्हेमधून समोर आले आहे. 39% शाळांना अतिक्रमणांनी ग्रासले आहे. ओपन जिम, मुलांची खेळणी तुटले आहेत.आप चे शहर सचिव अभिजित कांबळे आणि विभाग प्रमुख समीर लतीफ यांनी 61 शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन हा सर्व्हे पूर्ण केला.सर्व्हेमध्ये आढळून आलेल्या बाबींवर महापालिकेवर वाजत गाजत जाऊन प्रशासनाला haa अहवाल भेट देत जाब विचारणार असल्याचे आप चे कार्याध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी उत्तम पाटील, पूजा अडदांडे, विजय हेगडे, सदाशिव कोकितकर, संजय नलवडे, उमेश वडर, राजेश खांडके, वसंत पाटील, जयश्री पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post