स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यांसह मालाविरुध्दचे गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरिता मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडीत सो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना जिल्ह्या मध्ये घडलेल्या मालाविरुध्दचे गुन्ह्यांचा समांतर तपास करणे बाबत तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करून गुन्हे उघडकीस आणणेकरीता योग्य ते मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. या अनुशंगाने पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर कडील वेगवेगळी पथके तयार करून माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर कडील पोलीस अंमलदार आयुब गडकरी यांना त्यांचे विश्वासू बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, हातकणंगले पोलीस ठाणे, गु.र.नं. २९७/२०२३, भा.द.वि.स.क.३८०, ४६१ प्रमाणे दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार गुरुराज आतनुरे रा. उलपे मळा, कसबा बावडा, कोल्हापूर याने व त्याचे साथीदाराने मिळुन केला असून ते आज रोजी सदर गुन्ह्यातील बॅट-या विक्री करणेकरीता कसबा बावडा ते कदमवाडी जाणारे रोडवर जामदार टॉवर समोरील शाहू सर्कल चौकात येणार असले बाबत खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली.
त्यांना मिळाले माहिती नुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार संभाजी भोसले , राजीव शिंदे, बालाजी पाटील, नवनाथ कदम, आयुब गडकरी, संदीप गायकवाड यांचे तपासपथकाने दिनांक .०९.०७.२०२३ रोजी कसबा बावडा ते कदमवाडी जाणारे रोडवर जामदार टॉवर समोरील शाहु सर्कल चौकात सापळा लावून आरोपी नामे 01 ) गुरुराज मालतेश आतनुरे वय 23 रा.उलपे मळा, शुगर मिल, कसबा बावडा, कोल्हापुर, 2) प्रथमेश लक्ष्मण कानाडे वय 20 वर्षे, रा.इंदीरा नगर वसाहत, गांधीनगर, करविर, जि. कोल्हापुर, 3) गौतम जितेंद्र नायकवडी वय 21 वर्षे, रा. 138/19, सिस्टर गल्ली, गांधीनगर, ता. करविर, जि. कोल्हापुर, 4) सौरभ शरद माने वय 20 वर्षे, पाण्याचे टाकीजवळ, वळीवडे, ता. करविर, जि. कोल्हापूर यांना त्त्यांचे कब्जातील दोन विना नंबर प्लेट मोपेड अॅक्टीव्हा मोटर सायकल व वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या बॅट-या सह पकडले. सदर आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे कब्जात मिळालेली बॅट-या हया त्यानी आज सुमारे आठ दिवसापुर्वी रात्रौचे वेळी हेर्ले, ता. हातकणंगले येथुन चोरल्या असलेचे सांगीतले. सदरबाबत खात्री केली असता आरोपींचे कब्जात मिळालेल्या बॅट-या चोरीस गेले बाबत हातकणंगले पोलीस ठाणे, गु.र.नं. २९७/२०२३, भा.द.वि.स.क.३८०,४६१ प्रमाणे गुन्हा दाखल असलेची खात्री
झाली नमुद आरोपीं यांचे कब्जात मिळालेल्या दोन मोपेड अॅक्टीव्हा गाडयांबाबत कौशल्याने अधिक चौकशी केली असता त्यांचे कब्जात मिळालेल्या मोपेड गाडया हया त्यांनी गांधीनगर व शाहुपुरी पोलीस ठाणेचे हृददी मधुन चोरलेचे कबुली दिली असता त्याबाबत गांधीनगर व शाहुपुरी पोलीस ठाणे येथे मोपेड अॅक्टीव्हा मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीत यांचेकडुन बॅट-या, दोन मोपेड अॅक्टीव्हा मोटर सायकल असा मिळुन एकूण १,३९,१०० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करणेत आलेला आहे.
सदर आरोपीपैकी दोन आरोपी अभिलेखावरील असुन यातील गुरुराज आतनुरे याचेवर कागल, शिरोली MIDC, शाहुपुरी पोलीस ठाणे येथे मोटर सायकल चोरी, घरफोडी, महिला अत्याचाराचे असे एकुण तिन गुन्हे दाखल आहेत. तसेच प्रथमेश कानाडे याचे विरुद्ध गांधीनगर पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न असा गंभीर स्वरुपाचा एक गुन्हा दाखल आहे. नमुद आरोपी व जप्त मुददेमाल यांना पुढील तपासकामी हातकणंगले पोलीस ठाणे येथे हजर केलेले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री महेंद्र क. पंडीत सो व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई सो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार संभाजी भोसले, राजीव शिंदे, आयुब गडकरी, संजय पडवळ,
बालाजी पाटील, नवनाथ कदम, संदीप गायकवाड यांनी केली आहे.