अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या इसमास 5 वर्षे सक्तमजुरी सह 10 हजारांचा दंड ठोठावल




प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

   कोल्हापूर -विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश श्री.एम.बी.तिडके यांनी आरोपी यशवंत राजाराम मेने (रा.आरवली ,जि.रत्नागिरी )  यास अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी 5 वर्षे सक्तमजुरीसह 10 हजारांचा दंड ठोठावला. 

सदर आरोपी हा एका दुध संघाकडे क्लिनर म्हणुन नोकरीस होता.त्याची पन्हाळा तालुक्यातील पीडीत मुलीच्या नातेवाईकांची ओळख असल्याने पीडीत मुलीच्या घरी येणे -जाणे होते.या ओळखीचा फायदा घेत त्या पीडीत मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून ती पीडीत मुलगी अंगणात खेळत असताना सदर आरोपीने तिचा विनयभंग केला.सदर मुलगी रड़त असल्याचे पाहून तिच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता पीडीत मु लीने घडलेली हकिकत सांगीतली असता पन्हाळा पोलिसात तक्रार दाखल केली होती.

पन्हाळा पोलिसांनी सदर आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.ही घटना फ़ेब्रु.2015 ला घडली होती.या प्रकरणी आज आरोपीस विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश श्री.एम.बी.तिडके यांनी यशवंत मेने याला 5 वर्षे सक्तमजुरीसह 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला.या कामी सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले त्याना या कामी पन्हाळा पोलिस ठाण्याचे तात्कालीन तपासधिकारी हेड कॉ.पी.जे.भोवरी ,सहाय्यक महिला पोलिस निरीक्षक मिना जगताप आदीने सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post