प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- भाजपात एकनिष्ठ असलेले आपल्याला मंत्रीपद आज मिळेल ,उद्या मिळेल या आशेने डोळे लावून बसले होते.पण काल बाहेरुन आलेल्यांना मंत्री पदे दिली गेलीत .आता आपल्या नावाचा विचार होणार नाही.या कारणाने भाजपात नाराजी पसरली आहे.
यात एक मोठा गट बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. या बदलत्या राजकीय परिस्थितीत नाराज असलेले काही नेते जिल्हयातील ,तालुक्यातील असलेल्या कार्यकर्त्याना सोबत घेऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत.जिल्हयातील वेगवगळ्या तालुक्यातील प्रमुखांशी संपर्क साधला असल्याची चर्चा आहे.या साठी काही दिवसांची वाट पहावी लागणार आहे.
Tags
कोल्हापूर