प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप , संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन ,(बी.एड) पेठ वडगाव या महाविद्यालयामध्ये सोमवार दिनांक 03.07.2023 रोजी "गुरुपौर्णिमा" कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेज ऑफ एज्युकेशन बी. एड पेठवडगाव महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मळे आर.एल. मॅडम होत्या.सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी होते. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्या नंतर सन्माननीय प्राचार्या निर्मळे मॅडम , व शिक्षकांचे औक्षण करून विद्यार्थीनींनी सर्व गुरुवर्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी गुरू शिष्य नाते, त्यांच्याविषयी आदर ,प्रेम आपुलकी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.सर्व शिक्षकांनी त्यांचें अनुभव तसेच भावी शिक्षक कसा असावा त्यांच्या वाढत्या जबाबदाऱ्या याविषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या निर्मळे मॅडम यानी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. शिक्षक म्हणजे काय त्याची नैतिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी व कर्तव्ये यांची नव्याने आठवण करून दिली.
या निसर्गातील प्रत्येक वस्तू , घटना, पुस्तक,तसेच येणारी परिस्थिती वेळ खूप काही शिकवून जाते याचे मॅडम नी दाखले दिले.तसेच मुलांचा मोबाईल वापरण्याकडे वाढलेला कल , त्यासाठी जबाबदार असणारी आपल्या घरची परिस्थिती तसेच कुटुंब याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षकाने अनेक भूमिका पार पाडत जबाबदारीने राहीले पाहिजे यावर चर्चा करत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी प्रा.शिरतोडे व्ही.एल, प्रा.सोरटे एस. के, प्रा.चरणकर जे. एस, प्रा. सावंत ए. पी., ग्रंथपाल चौगुले एस.एस. तसेच सर्व प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयुरी पाटील यांनी केले. कार्यक्रमांचे आभार श्रद्धा पवार यांनी केले.सूत्रसंचालन दिव्या माने व अमृता चौगुले यांनी केले.
अशाप्रकारे कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड पेठवडगाव या महाविद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.