प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कागल -कागल तालुक्यातील उंदरवाडी येथील माजी जवान अशोक पाटील यांच्या दोन शिक्षक मित्र अनिल महादेव पाटील (रा .अकनूर ,ता .राधानगरी). आणि दुसरा शिक्षक प्रकाश पाटील.(रा.सरवडे ,ता.राधानगरी) किरण कृष्णा पाटील (रा.सरवडे ,ता.राधानगरी) आणि कंपनीचा हेड विनायक राऊत (रा.कासारवाडा ,ता.राधानगरी) या चौघांनी माजी जवानासह इतर चौघांची 50 लाखांची फसवणूक केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की ,माजी जवान असलेले अशोक पाटील हे वरिल शिक्षकांचे परिचयाचे आहेत.अशोक पाटील हे सेवा निवृत्त होऊन त्यांना 25 लाख रुपये आल्याचे समजले वरुन शिक्षक अनिल पाटील आणि शिक्षक किरण पाटील यांनी ई -स्टोअर इंडिया सुपर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे आमिष दाखविले मी नाही होय करीत आम्ही शिक्षक आहे.आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही तुमच्या रक्कमेला जबाबदार आहे असे म्हणत कंपनीचे हेड असलेले विनायक राऊत यांच्या कडे घेऊन गेले त्यानी ही आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास 35 महिने तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये आणि प्रॉपिट मागे पाच टक्के विक्री कमीशन तसेच आयुष्यभर तीन टक्के मोबदला मिळणार असे आमिष दाखविल्या मुळे त्यांच्या कंपनीच्या खात्यावर ऑनलाईन 25 लाख रुपये पाठवुन कंपनी आणि माझ्यात करार केला.त्यानंतर या सुपर मार्केट चे उदघाटन मोठ्या प्रमाणात तुम्ही करा त्याचा होणारा खर्च कंपनी तुम्हाला नंतर देईल आताचा खर्च तुम्ही करण्याचे या दोन शिक्षकांनी सांगितल्यामुळे मी राधानगरी येथे 26ऑगस्ट 2021रोजी शुभारंभ केला यासाठी मला दोन लाख रुपये खर्च मी स्वतः केला आहे.त्यांनी सांगितल्या प्रमाणे पहिले 11 महिने महिन्याला एक लाख प्रमाणे 11 लाख रुपये मिळालेत पण तेथुन पुढे परताव्या बरोबर त्यांच्या कडून विक्री साठी मालपण आला नाही .
वारंवार या दोघांच्या कडे मागणी करुनही आजता गायत टाळाटाळ करु लागले .कंपनी काही काळ गाळा भाडे आणि कामगार पगार कंपनी भागवत होती.पंरतु 11 महीन्यानंतर हे ही बंद केले त्यामुळे गाळा मालक आणि कामगार यांनी पगारा साठी तगादा लावला.मी शिक्षक अनिल पाटील आणि किरण पाटील यांच्या कडे वारंवार घरी जाऊन,फोन करून माझी रक्क्म परत करा अशी विनंती केली पण ते गुंडाच्या करवी धमकी देऊ लागले .माझ्यासह आयडी रजिस्टर करणारे लोकासहित सुमारे 50 लाखांची फसवणूक केली आहे.फसवणूक झालेल्यात सौ.रंजना तांबेकर (रा.कलनाकवाडी)यांची 25 लाख ,आयडी धारकांचे 30 लाख ,जयश्री सिताराम पाटील (कासारपुतळे). यांची 30 लाख रुपये.दयानंद देवर्डेकर (रा.तुरंबे).यांची 15 लाख,आणि नितीन कांबळे (रा.कोते)यांची दोन लाख रुपयांची फसवणूक केली आहे.यासह अनेक लोकांची त्यानी फसवणूक केली आहे.त्या भागात त्याचे वजन असल्यानं त्यांच्या दिलेल्या धमकीमुळे तेथील पोलिस स्टेशनला तक्रार दिली नसल्याचे सांगितले.अनिल पाटील एलआयसीत एंजन्ट असून सध्या पिरळ येथे शिक्षक आहे.तर किरण पाटील हा राधानगरी तालुक्यातील डवरवाडी येथे शिक्षक आहे. माझी पूर्ण रक्क्म गुंतविल्यामुळे माझी फसवणूक झाल्यामुळे मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.म्हणुन त्या चौघांवर कारवाई करुन माझी रक्कम परत मिळावी म्हणून आज पोलिस अधीक्षक यांच्या कडे तक्रार अर्ज दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.तसेच या तक्रार अर्जात माझ्या आत्महत्ये प्रकरणी संबंधित चौघांना जबाबदार आहेत असे अर्जात नमूद केल्याचे सांगितले.