प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर : पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहत आहे.शहरात अस्वछता वाढ़ली असून पुर्ण क्षमतेने शहरातील कचरा उठाव होत नाही.त्या मुळे डासाचे प्रमाण वाढत आहे.काही दिवसां पासून शहर आणि जिल्हयाच्या काही भागात डेंग्युची लागण झाली आहे.काही रुग्ण सरकारी रुग्णालयात न जाता खाजगी रुग्णालयातुन उपचार घेत आहेत त्यामुळे रुग्णांचा अंदाज लागत नाही.
सरकारी रुग्णालयात रक्त तपासणी होते .त्याचीच माहिती समोर येत आहे.आता पर्यंत 40 रुग्णाची तपासणीत काही जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.यातील काही रुग्ण मंगळवार पेठ यादवनगर ,शनिवार पेठ ,कदमवाडी या ठिकाणचे असून अन्य रूग्ण हे आसपास च्या गावातील आहेत.त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छतेकडे लक्ष देऊन प्रत्येक भागात तसेच रुग्ण असलेल्या भागात आरोग्य विभागाच्या वतीने औषध आणि धूर फवारणी करण्यात यावी.काही कर्मचारी औषध आणि धूर फवारणी करताना सर्व भागात न मारता ठरावीक ठिकाणीच मारुन जातात. परवा सी वार्डात एक कर्मचारी औषध आणि धूर फवारणी करत असताना ठरावीक ठिकाणीच मारत होते.तेथील एका नागरीकांने त्या कर्मचारयाला सांगितले कि सगळी कडे धूराची फवारणी करा येथे ही डासा आहेत.त्या कर्मचारयाने या कडे दुर्लक्श करून ठरावीक ठिकाणी फवारणी करुन निघून गेला.त्या मुळे आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे.