सिध्दार्थ नगर येथे 10 वी आणि 12 वीत उत्तीर्ण झालेल्यांचा जाहीर सत्कार !!!.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : माजी आमदार दलितमित्र दा. म. शिर्के फौंडेशनच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त सिद्धार्थनगर मधील इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व विशेष गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सत्काराचा कार्यक्रम दिनांक 30 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू समाज मंदिर येथे संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस.पी. कांबळे , महादेव कोल्हे , स्वाती काळे , रंजीत चव्हाण , विजय जरग , देवदास बानकर , सुशीलकुमार कोल्हटकर , गणेश जाधव , राजू तासगावकर , श्रीमती वसुधा शिर्के , श्रीमती निर्मला शिर्के , श्रीमती बेबीताई वसगडेकर , राजू बनगे , संदिप जिरगे , विकास कांबळे उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे पुस्तक देऊन स्वागत मल्हार शिर्के यांनी केले. तसेच प्रमुख पाहुण्यांनी आपली मनोगते व्यक्त केली व आभार प्रदर्शन प्रफुल्ल बनगे यांनी केले.