संभाजी भिडे यांच्या विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

               


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

   कोल्हापूर - आज कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोल्हापूर शहरात महात्मा गांधी यांच्या वडीला विषयी अपशब्द बोलल्या बद्दल संभाजी भिडे यांच्या विरोधात कोल्हापूर येथील कॉंग्रेस कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करून त्यांचा निषेध व्यक्त केला.

संभाजी भिडे यांनी अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे एका कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या वडील दुसरया धर्मातील जमीनदार होते असे विधान केल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहेत.ठिकठिकाणी काही पक्षांच्या वतीने जोरदारआंदोलने  निदर्शने केली जात आहेत.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सभाजी भिडे यांच्या व्यक्तव्याचा निषेध करून त्याच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.या वेळी कॉंग्रेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे याच्या  निषेधानार्थ जोरदार घोषणाबाजी केल्या .या आंदोलनात आ.ऋतुराज पाटील ,आ.जयश्री जाधव यांच्यासह अनेकांनी या आंदोलनात भाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post