प्रेस मीडिया लाईव्ह :
आज 30 जुलै वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेचा पहिला पुरस्कार गौरव समारंभासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लेखक, कवी ,कथाकार, कादंबरीकार आले होते. या सर्वांचा कौतुक सोहळा आपल्या कोल्हापूर नगरीच्या युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते उपस्थित संपन्न झाला. वाचनकट्टा संस्थेचा उद्देशच वाचनसंस्कृती वृद्धींगत करणे हा आहे. आजतागायत या संस्थेने वाचनसंस्कृतीसाठी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.
आजच्या कार्यक्रमाला युवराज्ञी संयोगिताराजे ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. वाचनकट्टा संस्थेची मुख्य समन्वयक म्हणून मी स्वतः उपस्थित होते .आज मला युवराज्ञी संयोगिता राजे यांचा तीन तासाचा सहवास लाभला. तीन तासाच्या कालावधीमध्ये संयोगिताराजे ह्या मला माझ्या मनाला पूर्णपणे भावून गेल्या. त्यांचा स्वभाव, त्यांच्याकडे असणारी नम्रता ,त्यांच्याकडे असणारे अफाट ज्ञान, सर्वसामान्य लोकांबद्दल असणारी तळमळ ,वाचनाचे महत्त्व, तत्परता, दूरदृष्टी, मराठी भाषेवर असणारे अफाट प्रेम ,प्लास्टिक मुक्ती साठी असणारी जाणीव जागृती ,वाचन संस्कृती विषयी असणारी तळमळ या सर्व गोष्टीमुळे मी भारावून गेले. मला ह्या गोष्टीची शंभर टक्के खात्री आहे की, आज सभागृह मध्ये असणारे सर्व सत्कारमूर्तीं व सर्व श्रोते या सर्वांना युवराज्ञी संयोगिता राजे यांचं व्यक्तिमत्व नक्की भावले असणार...
युवराज्ञी संयोगिता राजे यांचा सहवास मला फक्त दोन तासच लाभला पण त्या 2 तासामध्ये त्यांच्यामधील खूप सार्या गोष्टी त्यांच्याकडे असणाऱ्या खूप सार्या गोष्टींची मला जाणीव झाली. प्लास्टिकचा वापर न करणे, प्राथमिक शाळांच्या असणाऱ्या दुरावस्थेबद्दल त्यांना वाटणारी तळमळ.. मराठी भाषेवर असणारे त्यांचे प्रेम.. आणि विशेष म्हणजे वाचनकट्टा साठी वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना त्यांनी स्वतः वाचनकट्टा संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम यांना स्वतःहून काही पुस्तके भेट रुपात दिली. खरंच युवराज्ञीचे जेवढ कौतुक करावं तेवढं कमीच आहे.. वाचनकट्टाचा जो काही प्रवास आहे तो त्यांना इतका भावला की त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की वाचनकट्टा संस्थेच्या त्या आजीवन सभासद होण्यासाठी इच्छुक आहेत .एवढ्या मोठ्या युवराज्ञी आणि त्यांची वाचनाविषयीची असलेली तळमळ पाहून सर्वजण भारावून गेले. त्यामुळे मला असं लक्षात आलं की ... युवराज्ञी यांच्याकडे योग्य अशी निर्णय क्षमता आहे. त्यांना असं वाटतं की वाचनकट्टा ही चांगली संस्था आहे तर याच्यामध्ये आपणही आजीवन सभासद होणं गरजेचं आहे. असं त्यांना वाटलं ते त्यांनी ते तिथं तत्काळ बोलून दाखवले आणि युवराज कदम यांना ही ग्वाही दिली की तुम्हाला अगदी महिन्याला मी तुमच्या संस्थेसाठी तुम्ही म्हणाल ती पुस्तके मी तुम्हाला भेट देईल . आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यांमध्ये वाचनाविषयीची युवराज्ञी संयोगिता राजे यांना असणारी तळमळ पाहून प्रत्येक व्यक्ती भारावून गेली हे मात्र तितकच खरं आहे.
मला नेहमी वाटायचं की वाचनसंस्कृती लोप होत चालली आहे. पण आपल्या शाहू महाराजांच्या भूमीमध्ये वाचन संस्कृतीचा कधीच लोप होणार नाही याची खात्री मला आजच्या कार्यक्रमामुळे आणि युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांच्यामुळे झाली. त्यांचे वाचनावरचे प्रेम व त्यांचा असणारा रोजचा दिनक्रम ऐकून प्रत्येक व्यक्ती भारावून गेली. युवराज्ञी रोज काही ना काही नव्याने वाचत असतात आणि घरामध्ये सर्वांनाही त्यांच्या मुलांनाही त्या वाचनासाठी प्रवृत्त करत असतात ह्या गोष्टी ऐकून खूप छान वाटलं. साध्या साध्या त्यांच्या गोष्टी मधून ही गोष्ट लक्षात आली की, प्लास्टिक चा वापर युवराज्ञी करत नाहीत. मराठी भाषा शिकण्यासाठी चा त्यांचा अट्टाहास त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांचे अस्खलित मराठी हे सर्व माझ्या मनाला खूप भावलं.
छत्रपती शाहू महाराजांच्या मुळेच मी शिकू शकले. शाहू, फुले, आंबेडकरांच्या वस्तीगृहात राहूनच मी शिक्षण पूर्ण केले. आणि आज मी जे काही कार्य करत आहे त्याच्यामागे फक्त शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्यामुळेच.
मला आज छत्रपती शाहू महाराज यांच्या वंशज युवराज्ञी संयोगिता राजे ज्यांचा सहवास दोन ते तीन तास तास लाभला तो खरंच माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग होता . संयोगिता राजे यांचे जेवढे कौतुक करावे तितके कमीच आहे. संयोगिता राजे सारख्या व्यक्ती प्रत्येक राज्याला मिळो कारण इतकी विनम्रता, इतकी तत्परता, इतका साधेपणा आणि इतकं अफाट ज्ञान खूप साऱ्या गोष्टी संयोगिता राजेंकडे बघून मला शिकायला मिळाल्या. मला खूप साऱ्या गोष्टी भावल्या म्हणूनच मला भावलेल्या युवराज्ञी म्हणून संयोगिता राजे यांचं नाव घ्यावसं वाटतं.. आणि वैशिष्ट्य म्हणजे आजचा वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेचा पुरस्काराचा सोहळा एक अडीच ते तीन तास होता. संपूर्ण कार्यक्रमांमध्ये
युवराज्ञी यांनी प्रत्येक क्षण आणि क्षण अगदी प्रत्येक सेकंद त्यांनी लक्षपूर्वक ऐकला त्याचबरोबर त्या जराही विचलित झाल्या नाहीत. त्यांच्या हातामध्ये फोनही नव्हता माझ्या हातामध्ये फोन असूनही मी फोन घेतला नाही कारण युवराज्ञीचं वागणं आणि युवराज्ञींची प्रत्येक गोष्टीची छाप माझ्या मनाला खरंच भावली . संयोगिताराजे सारख्या युवराज्ञी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला लाभल्या हे आपलं खरंच सौभाग्य आहे. त्याहून मोठं भाग्य म्हणजे वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या याबद्दल मी खरंच त्यांची शतशः ऋणी आहे.
वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था मुख्य समन्वयक प्राचार्या रेखा निर्मळे-चौगुले.