प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - रेकॉर्डवरील सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तीस हजार रुपये कि मंतीचा मोबाईल जप्त करण्यात आला.बोबड्या कुंभार (रा.गांधीनगर) असे त्यांचे नाव आहे.
आज पंचगंगा परिसरात असलेल्या दर्ग्या जवळ चोरलेला मोबाईल विक्री साठी येणार असल्याचे समजले वरून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने त्या परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरी केल्याचे कबुली दिली आहे.वाढ़त्या चोरीच्या घटना तपासा साठी पोलिस अधीक्षक श्री.महेंद्र पंडीत यांनी पोलिस अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पोलिस निरीक्षक श्री.महादेव वाघमोडे यांनी पथके तयार करून सदर गुन्हयांचा तपास सुरु असताना वरील गुन्हा उघडकीस आला.या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्री.महादेव वाघमोडे ,पोलिस अंमलदार रामचंद्र कोळी ,अमित सर्जे ,सुरेश पाटील,सागर माने,संदिप गायकवाड यांनी भाग घेतला.