प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर/ प्रतिनिधी -
कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यात मुस्लिम, दलित अन्याय अत्याचाराच्या होत असलेल्या घटनांचा निषेध मोर्चा काढून विवध मागण्या संदर्भात मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यात मुस्लिम, दलित समुहाला जाणीवपूर्वक जातीयवादी शक्तीकडून लक्ष्य केले जात आहे. जातीच्या आणि धर्माच्या नावाने राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडवण्याचे षडयंत्र मनुवादी प्रवृत्ती करीत आहेत. बीड जिल्ह्यातील परळी गावात मुस्लिम समाजातील जरिन खान याचा पोलिस कस्टडी मध्ये मृत्यू झाला. जळगाव अमळनेर येथील पोलिस कस्टडी रिमांड काळात मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. परळी व जळगाव पोलिसांच्यावर खून केले प्रकरणी 302 दाखल करावा, फोटो स्टेटस ठेवले कारणाने समाजातील तरुणावर व त्यांच्या कुटुंबियांवर होणारे हल्ले थांबले पाहिजे, नांदेड हदगाव वाळकी येथे भीम जयंती साजरी केली म्हणून बौद्ध समाजातील अक्षय भालेराव या युवकाचा खून करण्यात आला, खून प्रकरणातील आरोपीची संपत्ती जप्त केली जावी, खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा मागण्या करण्यात आल्या. लातूर रेणापूर येथील मातंग समाजातील तपघाले कुटुंबावर जातीयवादी गावगुंडांनी केलेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषीवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच भारतातील हाफिज सय्यद मनोहर भिडे यांच्यावर राष्ट्रध्वज, राष्ट्रगाण व स्वतंत्रता दिन यांच्या बाबतीत केलेल्या बेताल व्यक्तव्याबाबत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
वरील मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार झाला नाही तर वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात या प्रश्नाच्या संदर्भाने मुस्लिम व दलित समाजाचे जन आंदोलन उभे करू, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाला तर यास महाराष्ट्र शासन व प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रारंभी छ. शाहू महाराज यांना अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली. राजाराम महाराज पुतळा मार्गे पार्वती टाकी मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदरच्या मोर्चास उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, कोल्हापूर शहराध्यक्ष मिलिंद पवार, उपाध्यक्ष प्रविण बनसोडे, इचलकरंजी शहराध्यक्ष ॲड. महेश कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदी, कामगार आघाडी अध्यक्ष संजय गुदगे, उपाध्यक्ष श्री. कागलकर, जिल्हा महासचिव महादेव कुंभार, महादेव कांबळे, सिद्धार्थ कांबळे, जिल्हा सहसचिव विश्वास फरांडे, जिल्हा संघटक तानाजी काळे, जिल्हा सह कोषाध्यक्ष शितल माने, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वासंती म्हेतर, महासचिव भाग्यश्री कांबळे, गीताताई कांबळे, मनिषाताई कांबळे, तालुका अध्यक्ष भिमराव गोंधळी, संदीप कांबळे, दामाजी कांबळे, अर्जुन दुंडगेकर, संजय कांबळे, साताप्पा कांबळे, उमेश कांबळे, पांडुरंग मानकापूरे, मच्छिंद्र कांबळे, अमित नागठिळे, नितीन कांबळे, प्रशांत कांबळे, राजाराम मालगे, विश्वास शिंगे, संजय कांबळे, जयेश कांबळे, अर्जुन कांबळे, रमेश पोवार, तालुका कार्यकारिणी व शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विलास कांबळे
जिल्हाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा उत्तर.
संजय सुतार
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख
वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा उत्तर.