प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : -राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. हसन मुश्रीफ यांचे आज कोल्हापुरात आगमन होत असून पदाधिकारी ,कार्यकर्त्यानी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली आहे . चार वाजता कागल येथील गैबी चौकात त्यांचा नागरी सत्कार आणि मेळावा आयोजित केला आहे.
यावेळी हसन मुश्रीफ आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत , या कडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागले आहे.आज साडे अकरा वाजता ताराराणी चौकात आगमन होणार आहे , ताराराणी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते दसरा चौकात राजर्षी शाहु महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून त्यानंतर शाहू समाधी स्थळाला अभिवादन करून शिवाजी चौकात शिवाजी महाराज पुतळ्याला हार घालून ते महालक्ष्मीचे दर्शन घेऊन काही काळ विश्रामगृहात थांबणार आहेत. त्यानंतर ते कागलला रवाना होणार आहेत.कागल येथे गैबी चौकात मुश्रीफ यांचा भव्य नागरी सत्कार आणि मेळावा आयोजित केला आहे.