परप्रांतीय खतरनाक गुंडाचे वास्तव्य कोल्हापूर शहरात आणि उपनगरात असण्याची शक्यता.? स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष.

 


 प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

   कोल्हापुर - पंजाबातील खतरनाक गुंड दिपक राठी हा कोल्हापुरात रहात असलेचे समजल्या वरुन पंजाब पोलिसांनी कोल्हापूरात येऊन स्थानिक पोलिसाच्या मदतीने ताब्यात घेतले.पंजाबच्या पोलिसांना फरारी आरोपी कोल्हापूर शहरात असल्याची माहिती मिळते पण कोल्हापूर पोलिसांना माहिती कशी नाही याचेच मोठे आश्चर्य वाटते.

कोल्हापूर गुप्तवार्ता पथक काय करते ? असा प्रश्न सर्वाँनाच पडला आहे  कोल्हापूर शहरात किंवा उपनगरात कोणी हद्दपार आणि फरारी गुंड कोणी भाड्याने रहात आहे का याची सखोल चौकशी करण्याची नितांत गरज  आहे. नागरिकानी सुद्धा आपल्या आसपास एखादी अनोळखी व्यक्ती रहात असेल तर त्याची माहिती पोलिसांना देणे  गरजेचे आहे, आणि ते प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.पोलिसांनी सुध्दा आपला वावर रस्त्यावर जास्तीत जास्त कसा राहिल या साठी दक्ष राहीले पाहिजे.

पोलिसांनी शहरात आणि उपनगरात मोक्याच्या ठिकाणी दिवसा आणि रात्री नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची तपासणी करणे गरजेचे आहेत.शहरात आणि उपनगरात असणाऱ्या गुंडाच्या साथीदावर लक्ष केंद्रित करून ते रहात असलेल्या भागात कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्याची गरज आहे.अशा तडीपार किंवा फ़रारी कोल्हापूरात आश्रयास असलेल्या गुंडाचे कुठे ऊठबस होते,यांचे साथीदार कोण आहेत याची ही चौकशी करण्याचे स्थानिक पोलिसांच्या समोर एक मोठे आव्हान आहे.

Post a Comment

Previous Post Next Post