प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- काही नेते मंडळी शरद पवारच आपले गुरु म्हणणारे सत्तेच्या खुर्ची साठी आपल्याच पक्षाशी गद्दारी करून कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्व्तःच्या स्वार्था साठी आपल्या गुरूचा विश्वासघात करून भाजप पक्षात गेला , याच गुरुनी ह्या शिष्याला काही वर्षांपूर्वी बाल हनुमान म्हणुन संबोधले होते .
रविवारी काहीनी मंत्रीपदाची शपथ घेतल्या नंतर या मंत्र्यांच्या समर्थनार्थ आणि त्याना शुभेच्छ्या देण्यासाठी शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरुन शरद पवार यांचा फोटोच गायब झाला आहे. या मंत्र्यांच्या निर्णयामुळे त्या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यात ,समर्थकांत आणि पदाधिकारयांत संभ्रावस्था निर्माण झाली आहे.अजित पवार यांनी आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नऊ आमदारासह शिंदे- फडणवीस सरकार मध्ये सहभागी होऊन सत्ता समीकरणे बदलून टाकली आहेत.आजतर पवार गटात दोन गट निर्माण झाले आहेत.एक शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट असे चित्र निर्माण झाल्यामुळे जिल्हयातील कार्यकर्तात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.बा विठ्ठला आता नेमका कोणता झेंडा हाती घ्यायचा यासाठी कार्यकर्त्यात खळबळ उडाली आहे.
आपल्या भागातील आमदारांनी असे का केले याचीच चर्चा गल्लोगल्ली ,गावागावात रंगली आहे.पण याचे उत्तर कोणाकडेही नाही.संबंधित मंत्र्याचे कार्यकर्ते गल्लोगल्लीत डिजीटल फ्लेक्स लावत आहेत.सोशल मिडीयावर शुभेच्छ्याचा वर्षाव सुरु आहे.मात्र शरद पवार यांचा फोटोच फ्लेक्स वरुन गायब दिसत होता.यामुळे राजकीय वर्तुळात चर्च्याना मोठे उधान आले आहे.राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून गेलेले आमदार शरद पवारांना देव मानत होते.मग शरद पवार यांचा फोटो कसा काय नाही ? आता याचे उत्तर त्या मंत्र्यांनाच द्यावे लागणार आहे.आताच ते आपल्या देवाला (गुरुला) विसरले काय असे प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उपस्थित होत आहेत.