प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कार दुरुस्त करण्यासाठी इंजीनचा पार्टचा गरज असल्याने तो पार्ट चोरण्यासाठी नवीन शक्कल लढवणारा नामदेव सर्जेराव महाडीक(वय 30 ,महाडीकवाडी ,ता.पन्हाळा) याने भाड्याने क्रेन घेऊन मित्राच्या मदतीने कदमवाडीतुन कार लंपास केली.
शाहूपुरी पोलिसांनी या गुन्हयांची उकल करून महाडीक याला अटक करून कार सहीत चोरीसाठी वापरलेली क्रेन ताब्यात घेतली.अधिक माहिती अशी की ,राजेशकुमार तोंडे -पाटील (रा.कदमवाडी).यांच्या कारची कदमवाडी परिसरातुन चोरीस गेली होती.यांच्या तक्रारी नंतर सहाय्यक फौजदार संदिप जाधव यांच्या पथकाने घटना स्थळी जाऊन चौकशी केली असता दोन व्यक्ती क्रेनच्या मदतीने घेऊन गेल्याचे समजले.क्रेनच्या मालकाचे नाव निष्पन्न झाले त्यांच्या कडुन संशयीत नामदेव महाडीक याचे नाव समजले त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता कार चोरीची कबुली दिली आहे.शाहुपूरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.