दोन कुंटुबांत जोरदार हाणामारीत दोन जखमी , राजेंद्रनगर येथील घटना.




प्रेस मीडिया लाईव्ह :   

मुरलीधर कांबळे :                                  

कोल्हापूर-सोमवारी रात्रीच्या वेळी  पूर्वीच्या वादातुन राजेंद्रनगर येथे शक्ती मंडळा जवळ दोन कुंटुबांत जोरदार हाणामारी होऊन दगडफेक करून घरांचे आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यात संतोष देवदास मोटे (वय 29)आणि आप्पासाहेब देवदास मोटे (वय 36 .रा.राजेंद्रनगर)हे दोघे भाऊ जखमी झाले.

या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीपीआर परिसरात दोन्ही गटाचे समर्थकांनी गर्दी केली होती.अधिक माहिती अशी की,त्या परिसरात रहाणारे बिरांजे आणि मोटे यांच्यात वाद आहे. या वादातुन मोटे कुंटुंबातील एकाने सचिन बिरांजे याला धक्काबुक्की केली यामुळे दोन्ही कुंटुबांतील वाद वाढ़त जात हाणामारी झाली.या वेळी दोन्ही बाजू कडुन दगड्फेक होऊन त्यात रस्त्यात उभा केलेल्या वाहनाचे नुकसान झाले.या भीतीने तेथील लोकांनी दारे बंद करुन घेतली यात शंस्त्राचाही वापर केल्याचे समजले.या हाणामारीत दोघे जण जखमी झाले आहेत.या प्रकरणी उशीरा पर्यत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.पोलिस निरीक्षक अनिल तनपूरे सीपीआर येथे दाखल होऊन तेथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post