प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -समन्सची प्रत देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलिस काजल गणेश लोंढ़े हिच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.आज त्या महिलेस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली
.तक्रारदार यांनी घरगुती कारणातुन पत्नीच्या विरोधात महिला सहाय्य कक्षाकडे त क्रार अर्ज दाखल केला होता.तो अर्ज निकाली काढ़ण्यात आला होता.त्या निकाली काढ़लेल्या अर्जाची समन्सची प्रत मागणी केली असता महिला कॉ.काजल लोंढ़े यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.त्या नुसार दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडुन गुरुवारी कारवाई केली होती.